🕒 1 min read
मुंबई: आषाढी एकादशीनंतर पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आजच्या दिनी गुरुप्रती आभार व्यक्त करतात. यानिमित्तानेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गुरुपौर्णिमेनिमित्त एक ट्विट केले आहे. सध्या हे ट्वीट चर्चेत आहे.
“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन!”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
दरम्यान शिवसेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वेगळा गट निर्माण झाला आहे. शिवसेनेशी बंड करत भाजपच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. तर शिवसेना आणि शिंदे गट यांचा सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepak Kesarkar : “राणेंनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे”, दीपक केसरकर यांचे वक्तव्य
- President Election : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया
- Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख यांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
- President Election | राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा ; उद्धव ठाकरेंची घोषणा
- KL Rahul । लवकरच होणार केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे ‘शुभमंगल’; लग्नाची तयारी सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
