🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा त्यांच्याशी कोणताही वाद राहणार नाही, असे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. ते सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकी दरम्यान बोलत होते.
दरम्यान यावेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यावरही निशाणा साधला. विनायक राऊत माझ्यामुळे खासदार झाले असून आमदारकीच्या आधी लोकसभा निवडणूक लागते हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. तसेच विनायक राऊत स्वत:ला मुख्यमंत्री समजत होते असा टोलाही केसरकर यांनी लगावला.
तसेच पुढे केसरकर यांनी म्हटले कि, नारायण राणे यांच्याशी विकासाच्या बाबतीत एकमत करायला मी तयार आहे. मात्र त्यांनी आणि त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलण्याचे टाळावे. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलणे टाळू शकतात तर राणे यांना अवघड जाणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
- President Election : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया
- Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख यांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
- President Election | राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा ; उद्धव ठाकरेंची घोषणा
- KL Rahul । लवकरच होणार केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे ‘शुभमंगल’; लग्नाची तयारी सुरु
- Supriya Sule : सत्ताधाऱ्यांमध्ये १०५ पैकी ५० त्यांचे आहेत आणि बाकी सगळे आपले – सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
