🕒 1 min read
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवार) मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी (राष्ट्रपती निवडणूक) पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी किंवा अन्य कोणीही आपल्यावर कोणताही दबाव टाकला नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना खासदारांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या घोषणेनंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले कि, “ज्यांचे संविधान आणि लोकशाहीला समर्थन आहे त्यांचा यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा आहे. आम्हाला कल्पना नाही की शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना का पाठिंबा देत आहे. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असले तरी त्यांनी याबाबत आमच्याशी चर्चा केली नाही,” असे थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान सोमवारी खासदारांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार आपल्यावर सोपवल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता. मात्र पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिलेने विराजमान व्हावे, ही शिवसेनेची इच्छा तर आहेच, शिवाय ती देशासाठी अभिमानाची बाब असेल. त्यामुळेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेचे शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, “शिवसेनेची नैसर्गिक युती भाजप आणि एनडीएशीच होऊ शकते. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.”
महत्वाच्या बातम्या:
- Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख यांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
- President Election | राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा ; उद्धव ठाकरेंची घोषणा
- KL Rahul । लवकरच होणार केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे ‘शुभमंगल’; लग्नाची तयारी सुरु
- Supriya Sule : सत्ताधाऱ्यांमध्ये १०५ पैकी ५० त्यांचे आहेत आणि बाकी सगळे आपले – सुप्रिया सुळे
- Imtiyaz jaleel। एमआयएमच्या डोक्यात आज ही सडकेच विचार – संतोष शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
