🕒 1 min read
मुंबई : काही महिन्यांपूर्वी पुष्पाला थिएटरमध्ये पाहिल्यानंतर, ज्या चाहत्यांनी अभिनेता अल्लू अर्जुनला डोक्यावर बसवले, त्याच्या स्टाईलचे रील बनवले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले, तेच चाहते आज त्याच्यावर नाराज आहेत. अल्लू अर्जुनाचा नवीन लूक पाहून चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. काहींनी त्याला ट्रोल करायला देखील सुरवात केली.
अल्लू अर्जुनचे फोटो पाहून लोकांनी लिहिले की, दिवसेंदिवस लठ्ठ होत चालला आहे. एकाने त्यांचे वर्णन मुंबईतील प्रसिद्ध वडापाव असे केले. अल्लू अर्जुनला पाहून श्रीलंकेचा गोलंदाज मलिंगाची आठवण झाली. अश्या अनेक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
https://www.instagram.com/p/CfQcEjzBNT5/
‘पुष्पा’ चित्रपटाच्या सिक्वेलमधला त्याचा हा लूक असू शकतो, असा अंदाज लोकांना लावला आहे. दक्षिणेतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेल्या अल्लू अर्जुन पुष्पाच्या सुपरहिटनंतर हिंदीमध्येही स्टार दर्जा राखण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अल्लू अर्जुनच्या नवीन लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहेत. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
