🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतर आमदारांनीही बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटात साधारण ४० हून अधिक शिवसेना आमदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. या सर्व गोंधळात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गुवाहाटीत असलेल्या शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली, त्यात त्यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, अशा शब्दात गुवाहाटीच्या सौंदर्याचं वर्णन केले आहे. यावरुन आता शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शहाजी बापू पाटलांना टोला लगावला आहे.
“एक आमदार म्हणाला काय झाडी, काय हाटील, काय पाणी, काय डोंगार मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं, निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे, असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी गुवाहाटीतील आमदारांवर अनेक टिकास्त्र सोडले. तसेच, बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, असंही ते म्हणाले. आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत संजय राऊत काय म्हणाले?
काल शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. 2019 साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहित आहे. जर 2019 साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असते. त्यावेळी भाजपने शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत ते जायला निघाले आहेत, असं संजय राऊत या कार्यक्रात बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
