🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या इंस्टाग्रामवरून लाईव्ह आला होता. आजच्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक राज कंवर यांच्या ‘दीवाना’ या चित्रपटातून शाहरुखने करिअरची सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे शाहरुख ने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी शाहरुख खानला सलमानबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शाहरुखने या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
शाहरुख खान सलमानबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला, “सलमान खानसोबत काम करताना मला कोणताही अनुभव नाही. फक्त प्रेम आहे, आनंद आहे, मैत्री आहे आणि भावासारखं नातं आहे. त्याच्यासोबत काम करणं नेहमीच उत्तम होतं. पण आमची मागची दोन वर्षं खूपच खास आहेत कारण तो माझ्या चित्रपटांमध्ये दिसला आणि मी देखील त्याच्या चित्रपटात दिसणार आहे.”
https://www.instagram.com/p/CfOhQciKKcO/
दरम्यान, लाईव्ह मध्ये शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांबद्दलही बोलला. ‘पठाण’चा ट्रेलर या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याचा खुलासा त्याने केला. त्याने सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींबद्दलही चर्चा केली. शाहरुखने गमतीने सांगितले की, ‘पठाण’मधील त्याची आणि दीपिका पदुकोणची हेअरस्टाइल सारखीच आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
