Share

 pravin darekar : “राज्यसरकारकडून अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश…” ; भाजपकडून राज्यपालांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकासाआघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पार्श्वभूमीवर मागच्या ४८ तासात १६० शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र यावरून प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. “सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हस्तक्षेप करावा, राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थितीमुळे २ दिवसांपासून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत, जीआर काढले जात आहेत. यामध्ये आपण तातडीने हस्तक्षेप करा”, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी हे पत्र ट्विटरला शेअर केलं आहे.

प्रवीण दरेकर यांचं ट्विट –

दरम्यान काल (२३ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, “राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू. सरकार टिकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!