Share

IPL 2022 Final GT vs RR : पहिली ट्रॉफी लाखमोलाची..! राजस्थानला धूळ चारत हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सनं पटकावलं विजेतेपद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

https://twitter.com/gujarat_titans/status/1530974657608056833

गुजरातचा डाव

राजस्थानच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने वृद्धिमान साहाला (५) स्वस्तात गमावले. प्रसिध कृष्णाने साहाची दांडी गूल केली. राजस्थानकडूनही युझवेंद्र चहलने दुसरा सलामीवीर शुबमन गिलला पहिल्याच षटकात जीवदान दिले. त्यानंतर दबावात खेळत गुजरातने मोठे फटके खेळले नाहीत. पॉवरप्लेच्या पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने गुजरातच्या मॅथ्यू वेडला (८) बाद करत राजस्थानला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर कप्तान हार्दिक पंड्याने गिलसोबत किल्ला लढवला. १० षटकात गुजरातने २ बाद ५४ धावा केल्या. १४व्या षटकात युझवेंद्र चहलने हार्दिकला स्लिपमध्ये झेलबाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला. हार्दिकने ३ चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या. या विकेटसह चहलने स्पर्धेत एकूण २७ विकेट्स घेत पर्पल कॅपचा मान मिळवला. त्यानंतर डेव्हिड मिलरने आक्रमक फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गिलने मॅकॉयला षटकार खेचत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४५ तर मिलरने १९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३२ धावा केल्या.

राजस्थानचा डाव

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. दबावात खेळणाऱ्या यशस्वीने २ षटकार आणि १ चौकार खेचत २२ धावा केल्या, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यश दयालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला (१४) गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने तंबूचा मार्ग दाखवला. १० षटकात राजस्थानने २ बाद ७१ धावा फलकावर लावल्या. १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राशिद खानने देवदत्त पडिक्कलला (२) स्वस्तात झेलबाद केले. तर पुढच्याच षटकात पंड्याने एक बाजू सावरलेल्या बटलरला यष्टीपाठी झेलबाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. बटलरने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. बटलरनंतर पंड्याने शिमरॉन हेटमायरलाही (११) झेलबाद करत राजस्थानचा अर्धा संघ गारद केला. अश्विनही (६) जास्त काही करू शकला नाही. २० षटकात राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या. गुजरातकडून कप्तान हार्दिक पंड्याने १७ धावांत ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय आणि युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स : शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, आर साई किशोर, मोहम्मद शमी आणि यश दयाल.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!