Share

IPL 2022 GT vs RR Final : बीसीसीआयने बनवली जगातील सर्वात मोठी जर्सी; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय लीगच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआय (BCCI) ने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचे अनावरण करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये प्रवेश केला आहे. या पांढऱ्या जर्सीवर 10 संघांच्या लोगोसोबतच आयपीएलचा १५ वर्षांचा प्रवासही कोरण्यात आला आहे. जर्सीची लांबी ६६ मीटर तर रुंदी ४२ मीटर आहे. ही जगातील सर्वात मोठी जर्सी आहे. ही जर्सी आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे ज्याने इतिहास रचला आहे.

आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र स्वीकारले.

फायनलचा विचार केला तर आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्स आणि पहिल्या हंगामातील आयपीएल विजेते राजस्थान रॉयल्स समोरासमोर आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने क्वालिफायर १ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. संजू सॅमसन आणि त्याच्या संघाने एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!