🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर पहिल्यांदाच बाबा बनला आहे. त्याने आज मंगळवारी सकाळी चाहत्यांना खुशखबर दिली. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून त्याने चाहत्यांना आपल्या मुलाची पहिली झलक दाखवली. यानंतर, हेटमायरला जगभरातून शुभेच्छा मिळू लागल्या. हेटमायरने राजस्थान रॉयल्सचा कॅम्प सोडला आहे आणि तो गयानाला निघून गेला होता. तो लवकरच संघात सामील होणार आहे.
गयाना येथे त्याच्या घरी जाण्यापूर्वी, हेटमायरने राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी घरासाठी फ्लाइट पकडली. आयपीएलच्या या मोसमात हेटमायरने ११ सामन्यांमध्ये ७०च्या सरासरीने आणि १६०च्या स्ट्राइक रेटने २९१ धावा केल्या.
Many congratulations to Shimron Hetmyer on becoming a father. pic.twitter.com/BwoLpsNcbs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2022
हेटमायरने केवळ एक अर्धशतक ठोकले आहे. मात्र सात सामन्यांत तो नाबाद राहिला आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान तिसऱ्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घर सोडण्यापूर्वी हेटमायरने सांगितले होते, की मूल एकदाच जन्माला येते आणि तो पहिल्यांदाच बाप होणार आहे. म्हणून तो घरी परतला आहे.
Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. ????
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
