🕒 1 min read
मिसिसिपी : शहरात सेलिब्रिटी म्हणून ओळख असणाऱ्या एका कोंबड्याचे अपहरण झाले व यानंतर कोंबड्याची हत्या झालेली बातमी देखील समोर आली. हे एकूण संपूर्ण शहरात खळबळ माजली. महिला पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा मिळावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
ही आगळीवेगळी घटना मिसिसिपी शहरातील आहे. कार्ल नावाच्या प्रसिद्ध कोंबड्याची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर देखील आंदोलने सुरु केले. कोंबड्याची हत्या झाल्यामुळे नागरिक घरातील व्यक्ती गेल्यासारखे रडत आहेत. हा कोंबडा मिसिसिपी शहरातल्या ओशन स्प्रिंगच्या रस्त्याच्या कडेला राहत होता. कार्ल नावाचा कोंबडा मुक्तपणे शहरात फिरायचा. तो दुकानात, हॉटेलमध्ये देखील जायचा लोक त्याला खायला देखील द्यायचे. त्यासोबतच तो शाळा, फिटनेस सेंटर, स्पा सेंटर या ठिकाणी देखील जायचा. त्याच्या फिरण्याचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता.
लोकांना तो कोंबडा इतका आवडायचा कि, ते त्याच्यासोबत सेल्फी काढायचे आणि सोशल मीडिया वर देखील लोक फोटो पोस्ट करायचे. एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याने कोंबड्याला गायब केल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता लागलेला नाही. लोकांनी त्याच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –

