🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळाले. तद्पश्चात राणा दाम्पत्यास अटक झाली. तसेच याप्रकरणी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात आज (२५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘किती द्वेष करायचा? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच जर हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू. लावा आमच्यावर राजद्रोह’, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले, ‘नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी फिरवली पाठ
- “मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
- ‘लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो’, गणेश नाईकांना करणी सेनेचा पाठींबा
- …तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?- देवेंद्र फडणवीस
- “सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही”, दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
