Share

राणा दाम्पत्यानी आंदोलनातून पळ काढला; संजय राऊतांचा टोला 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  राज्यात सध्या हनुमान चालीसावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी समर्थन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थाना समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याच्याच चर्चा अधिक रंगत होत्या. मात्र आज (२३ एप्रिल) दुपारी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यानी आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी राणा दाम्पत्यानी आंदोलनातून पळ काढला, असा टोला लगावला आहे.

“मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागेल म्हणून माघार घेतल्याचा राणा दाम्पत्याचा दावा सपशेल खोटा आहे. हिंदुत्वाच्या नावाने भाजपच्या काही लोकांनी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेनेवर हल्ला केला. काल आणि आज यांना मातोश्रीवर घुसून काही वेगळे कारस्थान करायचा यांचा डाव होता. हनुमान चालीसा वाचायची होती तर अनेक आध्यात्मिक जागा आहेत, त्यासाठी मातोश्री निवडणे आणि दंगल परिस्थिती निर्माण करणे, हे कुणाचे कारस्थान आहे? यांचा हिंदुत्वाशी संबंध काय आहे? श्री रामाचे नाव घेण्याला या बंटी आणि बबलीचा विरोध होता. अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता आणि आज हे लोक हनुमान चालीसा अशी भाषा वापरून महाराष्ट्रापुढे आव्हान निर्माण करत आहेत. मात्र शिवसेनेचे हिंदुत्व घंटा धारी नसून गदा धारी आहे.”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यानी आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “राज्यात पोलिसांना सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!