🕒 1 min read
मुंबई : “आमच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले जात होते. या प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो एवढंच राज ठाकरेंना सांगते. त्यांना जाग आली असेल तर चांगलच आहे. पण आता जागच राहावं. जागते रहो. नाहीतर निवडणूक आल्यावर दोन महिने उठायचं आणि नंतर काहीच नाही.” असा टोला शिवसेना नेत्या व मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
पेडणेकर या पत्रकारांशी बोलत होत्या. भोंग्यांच्या मुद्द्यावरून ही त्यांनी टीका केली. “ज्या भोंग्यांना परवानग्या आहेत आणि जे प्रदूषण टाळत असतील त्यांना कोर्टानेही परवानगी दिली आहे. मात्र विनापरवानगी भोंगे असती तर परवानगी नाही ही बाब सर्व धर्मांना लागू राहील. देशाची फाळणी पुन्हा कोणाला हवी आहे का? कोणत्याही गटाची मारामारी असो, सामाजिक सलोखा बिघडत असेल तर पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी.” असे पेडणेकर म्हणाले.
यावेळी पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. “कोव्हीड काळात भ्रष्टाचार झाला असे सोमय्यांना वाटत असेल तर त्यांनी तो बाहेर काढावा. पण खरं बोलून काढावा. कोव्हीड काळात मुंबई महानगरपालिकेने जे काम केले आहे, ते लोकांना माहित आहे. कोणीतरी अजेंडा राबवायचा म्हणून आरोप करू नयेत. गैरव्यवहार झाला असेल तर खरं बोलून तो बाहेर काढावा. एक बोट आपण दुसऱ्यांना दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा.” असे पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान किरीट सोमय्या यांची आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे विक्रांत निधी घेतल्याप्रकरणी चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उच्चन्यायालयाच्या चौकशीमुळे सोमय्या चौकशीला जात आहेत. या चौकशीमुळे पैसे कसे गोळा केले ? राजभवनात जाणाऱ्या पैशांना कसे पाय फुटले ? ते कुठे गेले ? याची माहिती समोर येईल. अर्थात हा तपासाचा भाग आहे. त्यावर मी बोलणार नाही,” असं राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
