Share

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AAP ला गांधींची आठवण!

Published On: 

🕒 1 min read

गुजरात : आम आदमी पक्षाने शहिद भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आपली पुढची वाटचाल असेल, असे पंजाब विधानसभा निवडणूक दरम्यान जाहीर केले होते. मान यांचा शपथविधी भगतसिंग यांचे मुळ गाव खटकर कलानमध्ये आयोजित करणे, तसेच भगतसिंह यांच्या शहिद दिनी सार्वजनिक सुट्टी जाहिर करणे या निर्णयांचा समावेश होता. मुख्यमंत्री कार्यालयात ही भगत सिंग आणि आंबेडकर यांचे प्रतिमा लावण्यात येईल असे आपने सांगितले होते. मात्र गांधींच्या प्रतिमेचा यात समावेश नव्हता. गांधीना मानणाऱ्या लोकांनी गांधीची प्रतिमा आपने डावलल्याने नाराजी व्यक्त केली होती.

https://twitter.com/AamAadmiParty/status/1510153991254339586?s=20&t=qShMUGve7TrZvPD9WtdvKw

पंजाबचा किल्ला सर केल्यानंतर आता आम आदमी पक्षाने येत्या दिवाळी दरम्यान होणार असलेल्या गुजरात निवडणुकांची तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि एकूणच आम आदमी पक्षाला महात्मा गांधी यांची आठवण आली आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

आम आदमी पक्षाने आज ट्विट करत काही फोटो शेअर केले आहेत. या ट्विटला ‘चरखा चलेगा गुजरात बदलेगा. ‘ असे कॅप्शन दिले आहे. यात भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल हे चरखा चालवताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य बदलले कि आपले आदर्श हि बदलतात का ? अशी चर्चा होऊ लागली आहे. यूथ काँग्रेसने याबाबत ट्विट करून आपवर संधीसाधूपणाची टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मराठीचा आग्रह धरायचा असेल तर…”- अजित पवार

“…मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का?”, प्रकाश आंबेडकरांचा मविआ सरकारला सवाल

हे काय! प्रीती झिंटाचे नाव ऐकताच संतापलेल्या इरफान पठाणने रैनाला लाइव्ह शो सोडण्याची दिली धमकी ; VIDEO व्हायरल

VIDEO : स्वत:चा बायोपिक पाहताना प्रवीण तांबेला फुटलं रडू; ४१व्या वर्षी केलं होतं IPL पदार्पण!

“थ्री व्हीलर”चं चांगलं चाललंय म्हणत आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!