🕒 1 min read
मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) खेळाडूंनी अलीकडेच माजी फिरकीपटू प्रवीण तांबेचा बायोपिक पाहिला. केकेआरच्या खेळाडूंसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यादरम्यान स्वत: प्रवीणही उपस्थित होता. बायोपिक पाहून झाल्यानंतर प्रवीण खूप भावूक झाला आणि त्याला रडू कोसळले. केकेआरने एक व्हिडिओही शेअर केला आहे.
प्रवीण केकेआरचा फिरकी गोलंदाजी सल्लागार आहे. बायोपिक पाहिल्यानंतर प्रवीण दोन शब्द बोलायला उभा राहिला, मात्र बोलण्यापूर्वीच त्याचा कंठ दाटून आला.
प्रवीण तांबेने २०१३मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ५० वर्षीय प्रवीणने संघर्षादरम्यान एकाच वेळी त्याचे काम आणि क्रिकेटचा समतोल साधला, त्याला कोणत्याही देशांतर्गत संघात स्थान मिळणे कठीण होते. तरी त्याने हार मानली नाही. त्याचा संघर्ष आणि मेहनतही फळाला आली आणि २०१३च्या आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने त्याची जिद्द ओळखली.
प्रवीण गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडूनही खेळला. त्यानंतर तो केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये रुजू झाला. केकेआर ही लीगमधील तांबेची शेवटची फ्रेंचायझी होती. त्याने ३३ आयपीएल सामन्यांत २८ विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
- “महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु”, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 MI vs RR : मुंबई इंडियन्सनं जिंकला टॉस; सूर्यकुमार यादव संघाबाहेर!
- जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना- मुख्यमंत्री ठाकरे
- VIDEO : “त्या ३५ धावा माझ्या करियरच्या….”, विराटनं जाग्या केल्या २०११ वर्ल्डकप विजयाच्या आठवणी!
- अखेर ‘त्या’ घटनेमुळे ‘विल स्मिथला’ द्यावा लागला ॲकडमीचा राजीनामा
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
