🕒 1 min read
मुंबई : अभिनेता राजकुमार राव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. परंतु आता राजकुमारसोबत कोणीतरी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजकुमारने ही सर्व माहिती आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ट्विटरवर फसवणुकीच्या अलर्टची माहिती देताना राजकुमार रावने लिहिले की, ‘कोणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर करून माझ्या नावावर 2500 रुपयांचे छोटे कर्ज घेतले आहे. यामुळे माझा CIBIL स्कोर खराब होईल. या पोस्टला CIBIL अधिकारी म्हणून टॅग करत, अभिनेत्याने पुढे लिहिले, ‘कृपया हे दुरुस्त करा आणि त्याविरुद्ध सावधगिरीची पावले उचला’.
राजकुमार राव यांच्या पॅनकार्डचा गैरवापर
‘अभिनंदन करो’ अभिनेता राजकुमार रावची ही धक्कादायक पोस्ट वाचून चाहते हैराण झाले आहेत. इतक्या कमी रकमेमुळे एखाद्याचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो का? राजकुमार राव यांनी ही पोस्ट गंमतीने केली आहे की प्रत्यक्षात त्यांच्यासोबत फसवणूक झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याबद्दल अभिनेताच काही सांगू शकतो.
महत्वाच्या बातम्या :
OMG..! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? PCB अध्यक्ष रामीज राजा ICCकडं जाणार!
“महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु”, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य
IPL 2022 MI vs RR : मुंबई इंडियन्सनं जिंकला टॉस; सूर्यकुमार यादव संघाबाहेर!
जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना- मुख्यमंत्री ठाकरे
VIDEO : “त्या ३५ धावा माझ्या करियरच्या….”, विराटनं जाग्या केल्या २०११ वर्ल्डकप विजयाच्या आठवणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
