🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ आज आमनेसामने आले आहेत. आज रंगणाऱ्या या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे काही प्रमुख कारण नसल्याचे मत रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर दिले. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला मुंबई संघात स्थान मिळालेले नाही.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, तर राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हेड-टू-हेड आकडेवारीत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात तगडी स्पर्धा आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत तर राजस्थान रॉयल्सने १२ सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, यजुर्वेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
