🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची इच्छा होती. अशा परिस्थितीत आता रमीझने या ऐतिहासिक स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्ण तयारी केली आहे. PCB अध्यक्ष रमीज राजा १० एप्रिल रोजी दुबईत ICC सोबत बैठक घेणार आहेत. ज्यामध्ये ते पाकिस्तान आणि भारत यांच्या उपस्थितीत चार देशांच्या स्पर्धेचा प्रस्ताव ठेवणार आहे.
ICCच्या नियमांनुसार, बोर्ड तीन देशांच्या मालिकेचे आयोजन करू शकते. कारण केवळ एक ‘जागतिक संस्था’ त्याहून अधिक देशांचे आयोजन करू शकते. मात्र, रमीझ राजा यांच्या ‘व्हाइट पेपर’ प्रस्तावानुसार, आयसीसी दर एक वर्षाने ही स्पर्धा आयोजित करू शकते. त्यामुळे त्याला मीडिया राईट आणि इतर बिझनेस एक्टिविटीज मधून ७५ कोटी डॉलरचा नफा मिळू शकतो. याशिवाय, रमीझ राजा (Ramiz raja) यांच्या प्रस्तावानुसार, या ऐतिहासिक स्पर्धेत पाकिस्तान आणि भारताव्यतिरिक्त दुसरे मोठे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देखील सहभागी होणार आहेत.
रमीझनुसार, प्रत्येक देशाला रोटेशनच्या आधारावर स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळेल. BCCI PCBच्या अध्यक्षांच्या या प्रस्तावाशी सहमत नाही. याबाबत खुलासा करताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आमचा फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) पूर्णपणे भरलेला आहे. याशिवाय, इतरही अनेक पैलू आहेत आणि सध्या त्यांना (पाकिस्तान) फक्त ICC स्पर्धांमध्ये खेळवण्याच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. त्याच वेळी, आम्हाला वाटत नाही की आयसीसी चार देशांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार असेल आणि राजाची ऑफर नाकारली जाईल.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु”, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य
- IPL 2022 MI vs RR : मुंबई इंडियन्सनं जिंकला टॉस; सूर्यकुमार यादव संघाबाहेर!
- जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवारांना- मुख्यमंत्री ठाकरे
- VIDEO : “त्या ३५ धावा माझ्या करियरच्या….”, विराटनं जाग्या केल्या २०११ वर्ल्डकप विजयाच्या आठवणी!
- अखेर ‘त्या’ घटनेमुळे ‘विल स्मिथला’ द्यावा लागला ॲकडमीचा राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
