🕒 1 min read
मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल(Prabhakar Sail) यांचा काल (१ एप्रिल ) मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने साईल यांचा मृत्यू झाला. यावरच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्वीट करत पोलिसांनी याचा तपास करावा, अशी मागणी केली आहे.
“प्रभाकर साईल मनसुख हिरेन बनला आहे का? प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्रावर स्थापन झालेल्या SIT मध्ये प्रभाकर हा सर्वात महत्वाचा व्यक्ती होता. प्रभाकर साईल यांच्या आकस्मिक निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवाल सांगेल पण पोलिसांनी याची चौकशी करावी”, अशी मागणी मोहित कंबोज यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर असल्याचा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही केली होती. किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या:
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“गुढी उभारू आरोग्य सुविधांची, बळीराजाच्या सौख्याची…”, राष्ट्रवादीच्या अनोख्या शुभेच्छा
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
