🕒 1 min read
मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, आज (२ मार्च) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवाजी पार्कवरील सभेतून मनसे सैनिकांशी संवाद साधणार आहेत. परंतु, त्यापूर्वी झालेल्या बॅनरबाजीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
शिवसेनाभवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमधून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या मेळाव्यात ते सत्ताधाऱ्यांवरती टीकास्त्रांचा वर्षाव करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राज ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊतांवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो २ एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे नेमका कोणता पिक्चर दाखवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…जुमलेबाज़ मोदी सरकार”, महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचे टीकास्त्र
- मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका
- पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
- आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन; फडणवीसांना निमंत्रण न दिल्याने लढाई..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
