🕒 1 min read
मुंबई: CSK संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी ४० वर्षांचा असला तरी वयाचा हा परिणाम त्याच्या खेळावर दिसत नाही. तो आताही विक्रम मोडण्यात आणि नवे विक्रम प्रस्थापित करण्यात मग्न आहे. त्याने नुकताच लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 7 व्या सामन्यात देखील एक विशेष कामगिरी केली आहे. ज्यात त्याने एक विक्रम रोहित आणि विराटच्या आधी नोंदवला आहे.
माहीने T20I क्रिकेटमध्ये झेलचे द्विशतक झळकावले आहे. क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे दररोज रेकॉर्ड बनवले जातात आणि मोडले जातात. लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉकचा झेल घेऊन त्याने T20I सामन्यांमध्ये २०० झेल पूर्ण केले आहेत आणि यासह तो २०० झेल घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एमएस धोनीने (MS Dhoni) यष्टीमागे १९५ झेल पकडले आहेत आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्याने ५ झेल पकडले आहेत. एमएस धोनीने T20I कारकिर्दीत यष्टिरक्षक म्हणून ५७ झेल घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रायझिंग पुणे जायंट्स (RPS) संघाकडून खेळताना इतर सर्व झेल टिपले आहेत.
एमएस धोनीपूर्वी, किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि डेव्हिड मिलर यांनी T20 फॉरमॅटमध्ये हा विक्रम नोंदवला होता. या तिन्ही खेळाडूंनी २०० झेलांचा आकडा गाठला आहे. किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो हे असे दोन खेळाडू आहेत जे जगभरातील T20 लीगमध्ये खेळतात. त्याचवेळी, माजी कॅप्टन कूलने केवळ भारतात आणि येथे लीग खेळताना हा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. धोनीशिवाय दिनेश कार्तिकने आतापर्यंत भारताकडून १९२ झेल घेतले असून कार्तिक या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैनाचे नाव आहे, ज्याने सर्वाधिक १७० झेल घेतले आहेत. तर रोहित शर्माने १४५ आणि विराट कोहलीने १४१ झेल घेतले आहेत. हे दोन्ही भारतीय खेळाडू माहीच्या खूप मागे आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
- अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
- IPL 2022: CSK vs LSG सामन्यात ‘या’ परदेशी खेळाडूने दाखवला जलवा; एक दोन नव्हे तर चार पुरस्कार पटकावले!
- “शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका
- “मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
