🕒 1 min read
मुंबई: आयपीएलचा ७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात चेन्नईची पहिली विकेट ही दुर्दैवाने एक रन आऊटच्या स्वरूपात पडली. ऋतुराज गायकवाड सलग दुसऱ्या सामन्यात दोन अंकी धावा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.
झाले असे की, सामन्यात लखनऊसाठी (LSG) पर्दापण करणाऱ्या तिसर्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टायने फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर ऋतुराजचा (Ruturaj gaikwad) फ्लिक शॉट चुकला, ज्यामुळे चेंडू त्याच्या पॅडवर आदळला, सुपर जायंट्सचे खेळाडू LBW अपीलसाठी गेले पण अंपायरने ते नाकारले. मात्र ऋतुराजला एक धाव हवी होती परंतु रॉबिन उथप्पाने ती नाकारली, ज्यामुळे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गायकवाडला पुन्हा क्रीजवर परतावे लागले परंतु रवी बिश्नोईच्या (ravi bishnoi) रॉकेट थ्रोने तो परत येण्यापूर्वीच स्टंप उडवले.
रवी बिश्नोईंच्या सुपर थ्रोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर ऋतुराज पुन्हा कोणतीही मोठी कामगिरी न करता माघारी परतल्याने चेन्नईचे चाहते थोडे निराश झालेले दिसत आहेत. त्याने ४ चेंडूत केवळ एक धाव केली होती तर मागच्या सामन्यात तो ४ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : देखो वो आ गया..! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मिळाली आनंदाची बातमी
- IPL 2022: CSKला टक्कर देण्यास LSG तय्यार..! नाणेफेक जिंकत राहुलचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- सण साजरे करत असताना कोणतेही निर्बंध लागू नाहित – जितेंद्र आव्हाड
- चेहऱ्यावर रक्ताचे डाग! सनी लिओनीचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
- मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मेट्रोचा दौरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
