Share

“आप’ल्याला ह्यात ओढू नका!” म्हणत अभिनेता संदीप पाठकने अरविंद केजरीवालांना टॅग केल ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या पंजाबमध्ये आपचा बोलबाला आहे. आम आदमी पार्टीचे  चाणक्य  म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक यांना आपने पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिलं गेल आहे. पंजाबमध्ये आपची सत्ता येण्यात संदीप पाठक यांचा मोठा हात होता. पाठक यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्जही भरला आहे. पण या सगळ्यात मराठी अभिनेता संदीप पाठक चर्चेत आला आहे. ‘आप’ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी अभिनेता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय. त्यावर आता संदीप पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी अभिनेता संदीप पाठकने आप उमेदवार म्हणून त्याचे फोटो वापरण्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “तो मी नव्हेच! आप चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, असं ट्विट संदीप पाठक ने केलं आहे. यात त्याने आम आदमी पक्षाला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टॅग केलंय. संदीपच्या या ट्विटच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!