🕒 1 min read
पणजी: काल अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विश्वजीत राणे यांनीच प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही सावंत यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर गेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सावंत सरकारचा येत्या 23 किंवा 24 मार्च रोजी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा होणार होता. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरूही होती. सरकार स्थापनेसाठी सावंत यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. मात्र, खुद्द पंतप्रधान आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता यावे म्हणून हा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
