Share

Hijab case : कर्नाटक हायकोर्टात आज होणार फैसला; अनेक जिल्ह्यांत कलम १४४

Published On: 

🕒 1 min read

कर्नाटक : देशभरात गाजलेल्या हिजाब प्रकरणावर आज (१५ मार्च) कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.(Hijab case to be decided in Karnataka High Court today) याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.

दरम्यान न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर सदरील प्रकरण निकालासाठी राखून ठेवण्यात आले होते.

दरम्यान सदरील प्रकरण उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला आणि त्यानंतर बराच विरोध करण्यात आला. तर दुरीकडे काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घेऊन आल्याने हा वाद अजूनच चिघळला होता. याचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले होते. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान हिजाब प्रकरणी मुलींनी हायकोर्टात जाऊन हिजाब परिधान करुन वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब किंवा भगवी शाल घालण्यास परवानगी नसल्याचा अंतरिम आदेश जारी केल्याने याचिकाकर्त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!