🕒 1 min read
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदी दौऱ्यावर येणार हे जाहीर झाल्यापासूनच इतर पक्षांच्या नेत्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने शरद पवार म्हणाले कि, पंतप्रधानांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत. शरद पवारांच्या याच टीकेला आता भाजपने उत्तर दिले आहे.
काय आहे भाजपचे प्रतिउत्तर
आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? असा सवाल भाजपने केला आहे. तुमची अडचण इथे आहे की, ‘मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही’ असे म्हणत भाजपने पवारांवर खोचक टीका केली.
पवार नेमकं काय म्हणाले होते
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी पवार म्हणाले होते कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत, यावर माझा आक्षेप नाही. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचे कारण नाही. ते मेट्रो का सुरू करत आहेत. ते मला माहिती नाही. महिनाभरा पूर्वीच मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेले होते . पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्याच मार्गाने मी देखील गेलो. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही. मग काम झालं नाही तरी उद्घाटन की करताय, असे शरद पवार म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
