🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) तथा त्यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर दिशा सालियन बदनामी प्रकरणी (Disha Salian defamation case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियनचा मृत्यू होऊन आता जवळपास दोन वर्ष उलटली असून नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूसंदर्भात गंभीर दावे केले होते. दरम्यान, मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तद्पश्चात आपली बाजू मांडण्यासाठी काल(५ मार्च) नारायण राणे आणि नितेश राणे हे मालवणी स्टेशनला हजर झाले होते.
नऊ तासांच्या चौकशीनंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यावर नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आल्याचा दावाही राणेंनी यावेळी केला. यावेळी बोलत असतांना राणे म्हणाले की,‘माझ्या जबाबत मी सुरुवातीपासून घडलेली संपूर्ण माहिती दिली. इतकेच नाही तर दिशा सालियानची ८ आणि सुशांतची १३ जून रोजी हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोनदा फोन आला’, असा दावा राणेंनी केला.
दरम्यान, फोनवर मुख्यमंत्री मला म्हणाले की, आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. एक मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. यावर मी म्हणालो, आम्ही लोक प्रतिनिधी आहोत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाही तुम्हाला देखील मुलं आहेत तुम्ही असं काही करू नका, असे राणे म्हणाले. परंतु त्यांच्या जबाबातून हे वाक्य वगळण्यात आल्याचेही राणेंनी यावेळी सांगितले. तसेच मी वारंवार सांगतोय की ते वाक्य टाका परंतु ते वगळलेलं आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतून प्रेरित होऊन, मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत, असेही राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Disha Salian Case : नऊ तासांच्या चौकशीनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी अमित शहांना फोन केला आणि…”
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नला मिळाली होती बॉलिवूडची ऑफर…स्वतः दिला खुलासा
- “तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्यांना याआधी कोणी ओळखत नव्हते”- गिरीश महाजन
- मग तुम्ही मेट्रोतून फिरून का आलात? गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल
- IND VS SL : रवींद्र जडेजाचे दुहेरी शतक न होण्यामागे कोण?… रोहित की द्रविड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
