🕒 1 min read
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला होता. त्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केल्यामुळं नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता खुद्द नारायण राणे आणि नितेश राणे आज मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. मालवणी पोलीस स्टेशनला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यावर नारायण राणे आणि नितेश राणे आज त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडणार आहेत. मात्र, गेल्या चार तासापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असल्याने पोलीस ठाण्याबाहेर जमलेले समर्थक तसेच कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“तेव्हा संजय राऊत कुठे होते? त्यांना याआधी कोणी ओळखत नव्हते”- गिरीश महाजन
-
मग तुम्ही मेट्रोतून फिरून का आलात? गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल
-
IND VS SRI : रवींद्र जडेजाचे दुहेरी शतक न होण्यामागे कोण?… रोहित की द्रविड
-
‘…आणि मग राज्यपालांवर टीका करायची’; फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
