🕒 1 min read
बिहार: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना (250 Indian nationals) घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी (२७ फेब्रुवारी) पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळावर निर्वासितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
दरम्यान यावेळी बिहारच्या नागरिकांचाही यामध्ये समावेश होता. यावेळी युक्रेनमध्ये अडकलेले बिहारचे विद्यार्थी त्यांच्या मूळ राज्यात पोहोचले. “परत आल्याचा आनंद झाला. भारतीय ध्वज पाहून युक्रेनियन किंवा रशियन काहीही बोलणार नाहीत, त्यामुळे दिलासा मिळाला. तिथली परिस्थिती गंभीर आहे, आमचे काही मित्र बंकरमध्ये राहतात,” असे एका विद्यार्थ्याने म्हटले आहे.
दरम्यान “आमच्याकडे बिहारमधील (युक्रेनमध्ये अडकलेल्या) सुमारे २७३ विद्यार्थ्यांची यादी आहे, ही संख्या वाढू शकते. बिहार सरकार त्यांच्या खर्चावर त्यांना घरी आणेल. बिहार फाऊंडेशन आणि बिहार भवन ची टीम विद्यार्थ्यांच्या बाहेर काढण्याचे काम करत आहेत”, असे बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची नियुक्ती
- “मी या देशाचा पंतप्रधान बनून दाखवतो”, अभिजित बिचुकलेंचे मोठे वक्तव्य
- Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भात संभाजी राजेंच्या उपोषणास अभिजीत बिचुकलेंची भेट
- दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल
- “…हे सगळं राजकारणासाठीच केलं जातंय”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
