मुंबई: ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Language Pride Day) म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभरात हा दिन साजरा केला जातो.
याच पार्श्वभूमीवर आज ‘मराठी भाषा गौरव’ दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे (Amit Thackeray as President of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या अधिक्रूत ट्वीटर अकाउंट वर माहिती देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित या महत्वाच्या नव्या जबाबदारीसाठी अमित ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज 'मराठी भाषा गौरव' दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी श्री. अमितजी राजसाहेब ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित या महत्वाच्या नव्या जबाबदारीसाठी श्री. अमितजी ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/QMSYGJnApQ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 27, 2022
‘मराठी भाषा गौरव’ निमित्त मनसेचा अनोखा उपक्रम-
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे नवी मुंबईत एक विशेष उपक्रम राबवत आहे. लेखक राहुल साळवे यांनी शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा संदेशाला ख्यातनाम सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षररूपात साकारलेली एक लाख पोस्ट कार्ड्स नवी मुंबईकरांना घरोघरी जाऊन महाराष्ट्र सैनिकांनी दिली आहेत. या पोस्ट कार्डचे अनावरणही अमित ठाकरे यांनी केले होते. दरम्यान आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा असे आवाहनही मनसेकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल
- “…हे सगळं राजकारणासाठीच केलं जातंय”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळायला हवं- अजित पवार
- “…म्हणून भाजप नेते मराठी भाषा व मराठी माणसाचा कचरा करतात”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- मराठी भाषेचे शत्रू महाराष्ट्रातच आहेत- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

