Share

‘चांदीवाल आयोगाच्या समोर माझी बाजू मांडणार’ – नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: चांदीवाल आयोगाने राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना समन्स बजावले आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे. अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे आपली प्रतिमा खराब होत असल्याचे सचिन वाझेने म्हटले होते.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Vaze) चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांनी अँटिलिया प्रकरणामागे मी आणि परमबीर सिंह असल्याचे म्हटले आहे. अशा वक्तव्यामुळे प्रतिमा खराब होत आहे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. त्यामुळे आयोगाने त्यांना समन्स बजावून चौकशी करावी. त्यामुळे ते कोणत्या आधारावर आरोप करत आहे हे स्पष्ट होईल अशी मागणी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक म्हणाले, चांदीवाल आयोगाने मला १५ तारखेला नोटीस पाठवली होती. वाझेने काही आक्षेप घेतले होते की मी त्यांची बदनामी करतो. आयोगाच्या कारवाईमध्ये जे काही अनिल देशमुख यांनी सांगितले त्याच्या आधारावर मीडियासमोर बोलतो. मी स्वतः ११.३० वाजता आयोगासमोर जाणार आहे. माझे वकील माझी बाजू आयोगासमोर मांडतील, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!