🕒 1 min read
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. तद्पश्चात राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटलेला दिसून येत आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगत आहे. असे असतांनाच आता या प्रकरणी पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
यासंदर्भात सोमय्या यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माझ्या वरील शिवसेनेच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी पुण्यामधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दिलीप गोरे, सतीश कुंभार या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे’, असे सोमय्या म्हणाले.
Dilip Gore & Satish Kumbhar Police Constant of Shivajinagar Pune police station are suspended in the case of Shiv Sena Goons attack on Me
माझा वरील शिवसेनेचा गुंडांनी केलेल्या हल्ला प्रकरणात शिवाजीनगर पुणे, पोलिस ठाण्यातील दिलीप गोरे, सतीश कुंभार दोन पोलिस निलंबित करण्यात आले pic.twitter.com/xfvA2DCQbr
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 13, 2022
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तद्पश्चात ११ फेब्रुवारी रोजी त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा सत्कार केल्यानंतर पुणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली.
महत्वाच्या बातम्या :
- “पूर्वी बाळासाहेबांच्या आणि आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण”
- सुरांच्या अप्सरेला वेगळ्या स्मारकाची गरज काय?- संजय राऊत
- IPL AUCTION 2022: पाहिल्या दिवसानंतर कोणाकडे बाकी आहे किती पैसे; जाणून घ्या!
- बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवेतील स्मारक तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे – राष्ट्रपती
- “१० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल” – चंद्रकांत पाटलांची पुनरावृत्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

