Share

Hijab controversy: हिजाब मुद्द्यावरून कर्नाटकातील भाजप आमदाराला जीवे मारण्याचा धमक्या

Published On: 

🕒 1 min read

कर्नाटक: कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. आता त्यात नवीन मुद्दा म्हणजे उडुपीचे भाजप आमदार के रघुपती भट यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. (BJP MLA in Karnataka threatens to kill) यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

के रघुपती भट उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर वुमनच्या विकास समितीचे अध्यक्ष असून त्यांना आलेले बरेच कॉल परदेशातून आलेले इंटरनेट कॉल्स असल्याचा दावा त्यांनी केला आहे. के रघुपती भट म्हणाले की, हिजाबच्या मुद्द्यावर जर त्यांनी ठोस भूमिका घेतली तर त्यांना अधिक लक्ष्य केले जाईल, अशा धमक्या देण्यात आल्या. याबद्दल त्यांनी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांना माहिती दिली आहे.

दरम्यान के रघुपती भट यांनी उडुपीमधील मुस्लीम त्यांच्यासोबत असून जिल्ह्यातील काझींनी त्यांना या मुद्द्यावरून पाठींबा दर्शवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हिजाब वाद अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!