🕒 1 min read
मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. यानंतर भाजप आमदार राम कदम(Ram Kdam) यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली. यावरून राज्यात राजकीय वाद पेटलेला दिसून येत आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच पूर्वी बाळासाहेबांच्या आणि आता लतादीदींच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. शिवतीर्थावर त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला ते योग्यच झाले; पण जेथे अग्नी दिला तिथेच लता मंगेशकरांचे स्मारक करा, अशी मागणी भाजपने केली. पूर्वी बाळासाहेबांच्या स्मारकावरून व आता लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद करणे हे रोगट मानसिकतेचे लक्षण आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि हिंदूंना जे दिले त्याची भरपाई एका स्मारकाने होणार नाही. लता मंगेशकरांनी तर सात दशके सूरस्वरांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला वेदना विसरायला लावल्या. या दोन्ही व्यक्ती जिवंतपणीच दंतकथा बनल्या. त्यांची स्मारके झाली काय, नाही झाली काय, फरक पडत नाही.’ तसेच दिल्लीतील मोदी सरकारने महात्मा गांधी, पंडित नेहरूंना झाकण्याचा अतोनात प्रयत्न चालवला आहे. पण अशी झाकाझाकी करून गांधी-नेहरूंचे विस्मरण कोणाला होणार आहे का?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
दरम्यान, लता मंगेशकरांच्या स्मारकाचा वाद घालणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, त्यांची विधाने महाराष्ट्राची मान शरमेने झुकावी अशी आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झाले. कारण शिवाजी पार्कशी बाळासाहेबांचे नाते होते. याच मैदानातून त्यांनी महाराष्ट्र अस्मितेचे रणशिंग फुंकले. चाळीस लाख लोक बाळासाहेबांना अखेरची मानवंदना देण्यासाठी आले. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवतीर्थ हाच एकमेव पर्याय होता. लता मंगेशकर हा अपवाद. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, ”शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला हवे. त्याची स्मशानभूमी होऊ नये.” प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत. खुद्द हृदयनाथ मंगेशकर यांनीही लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे अशी आमची इच्छा नाही. त्यावरून राजकारण थांबवा, अशी अत्यंत योग्य आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- भाजपने गोव्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, आदित्य ठाकरे यांची टीका
- सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड! – नाना पटोले
- IPL AUCTION 2022: हर्षल पटेलची जादू पुन्हा बँगलोरसोबत चालणार
- बाबासाहेबांच्या मूळ गाव आंबडवेतील स्मारक तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे – राष्ट्रपती
- “१० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल” – चंद्रकांत पाटलांची पुनरावृत्ती


