🕒 1 min read
मुंबई: आयपीएल मेगा सध्या बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आरसीबीने हर्षल पटेलला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावली. सनरायझर्स हैदराबाद संघही त्याला विकत घेण्यावर ठाम होता, त्यामुळे हर्षलला खरेदी करण्यासाठी दोघांमध्ये युद्ध सुरू होते. हर्षलच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.
आरसीबीने गेल्या आयपीएल हंगामातील हिरो हर्षल पटेलला पुन्हा आपल्या संघात समाविष्ट केले आहे. त्यांनी १०.७५ कोटींमध्ये हर्षल पटेलला परत आणले आहे. हर्षल पटेलला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत झाली. हर्षल पटेल याआधीही आरसीबी संघाकडून खेळायचा. हर्षल पटेलची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.
हर्षल पटेलने आयपीएल २०२१ मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. त्याने आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅप जिंकली. त्याने आक्रमक गोलंदाजीचा नमुना सादर केला होता. स्लो बॉल विकेट घेण्याची त्याची कला आहे आणि तो दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. ही कामगिरी पाहून त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. जिथे त्याने या संधीचा फायदा घेतला. हर्षल पटेल गेल्या वर्षी त्याच्या गोलंदाजीने सर्वांसाठीच न समजणारे कोडे बनले होते. त्याचे चेंडू खेळणे कोणालाही जमत नव्हते. गेल्या हंगामात तो आरसीबीसाठी सर्वात मोठा गेमचेंजर म्हणून उदयास आला. त्याच्या गोलंदाजीच्या जादूपासून कोणीही सुटू शकले नाही.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने गोव्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, आदित्य ठाकरे यांची टीका
- खाता कोणाच मटण दाबता कोणाच बटन?; गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
- ७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
- शाईफेक प्रकरणातील आरोपींना पोलिसांची मारहाण; नवनीत राणा यांचा आरोप
- सोलापुरात विनाहेल्मेट फिरणाऱ्या १७ पोलिसांवर कारवाई


