🕒 1 min read
बंगळुरू : IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर यंदा बोली लागली नाही. कोणत्याही संघाने रैनाला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. जिथे सुरेश रैना चिन्ना थाला म्हणून ओळखला जायचा त्या चेन्नई सुपर किंग्सनेही त्याला संघात घेतले नाही. मात्र तो आज पहिल्या फेरीत विकला गेला नाही आणि उद्या दुसऱ्या फेरीत वेगवान ऑक्शनमध्ये परत येईल. त्यामुळे उद्या त्याची निवड होऊ शकते.
सुरेश रैनाने त्याची बेस प्राईस २ कोटी ठेवली होती. रैना गेल्या अनेक मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) भाग होता. महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच सुरेश रैनाही गेल्या काही वर्षांत CSK चा अविभाज्य भाग होता. केवळ २०१६ आणि २०१७ च्या हंगामात CSK वर बंदी घालण्यात आली तेव्हा रैना गुजरात लायन्सकडून खेळला. बाकी उर्वरित सगळे हंगाम त्याने चेन्नई सोबत खेळले आहेत.
दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये परतले तेव्हा संघाने सुरेश रैनाला संघात रिटेन केले. वैयक्तिक कारणांमुळे रैनाने २०२० च्या हंगामातून बाहेर पडला होता. आयपीएल २०२१ मध्ये तो परतला, मात्र त्याने १२ सामन्यांमध्ये १६० धावांसह सरासरी कामगिरी केली. IPL 2022 मेगा ऑक्शनपूर्वी, CSK ने रैनाला रिटेन केले नव्हते. सुरेश रैनाला चेन्नईने रिटेन न केल्याने चाहते निराश झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला
- IPL Auction 2022: राणाची नाईटरायडर म्हणून कोलकत्यात वापसी
- समीर वानखेडेंना अनुसूचित जाती आयोगाचा दिलासा! नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धाडसत्र सुरूच; नागपुरात सीएची चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
