🕒 1 min read
मुंबई : अनुसूचित जाती आयोगाने केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांना मोठा दिलासा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांना झटका दिला आहे. कागदपत्रांनुसार समीर वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते’ असे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाने म्हंटले आहे. तसेच नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप केला होता. तद्पश्चात शुक्रवारी झालेल्या एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान आयोगाने वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
दरम्यान, आयोगाकडून आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११,४९९,५०३,५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापूर्वी समीर यांच्या तक्रारीवरून गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनाही नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022 : डेव्हिड वॉर्नरची दिल्लीत घरवापसी
- IPL auction 2022 : ट्रेंट बोल्टला राजस्थान रॉयल्सने ८ कोटींत केले खरेदी
- “…मग आमच्याबद्दल बोलता तरी का?”, आदित्य ठाकरेंचा भाजपला सवाल
- IPL Auction 2022 : शमी गुजरातकडून खेळणार; तेही मागच्या वेळापेक्षा जास्त किंमतीत
- VIDEO: गुलाबराव पाटलांचा भाजपला दणका!; ४ नगरसेवकांनी हातात बांधलं शिवबंधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
