Share

गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस भाजप आमने-सामने; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना पसरवण्यात कॉंग्रेस आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यावर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान मोदींच्या या वक्तव्याविरोधात कॉंग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन छेडले आहे. (Congress agitation outside Gadkari house)कॉंग्रेसचे अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजप आमने-सामने आले आहेत.

कॉंग्रेस कार्यकर्ते अतुल लोंढे यांनी नागपूरचे खासदार म्हणून नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी नरेंद्र मोदींना(Prime Minister Narendra Modi) महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागण्याची विनंती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा अभिमान ठेवायला हवा. असेही ते म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपही याठिकाणी आंदोलन करत आहे. कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते याठिकाणी जमले भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

गेल्या ५० वर्षांत ज्यांनी देशाच्या विकासासाठी काही काम केले नाही, असे निकम्मे जर नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करत असतील ,तर भाजप त्यांचे आंदोलन फोडून काढेल. असा इशाराही भाजपने दिला आहे. दरम्यान या आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’ च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच “सोनिया जिसकी मम्मी हे वो सरकार निकम्मी हे”, “मोदी जी संघर्ष करे, हम तुम्हारे साथ हे”,अशा घोषणाही भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी भाजप कार्यकर्ते याठिकाणी जमले असल्याचे भाजपने म्हटले आहे. मात्र यामुळे नागपूर शहरात या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ-

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!