Share

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ‘ईडी’समोर महत्त्वपूर्ण खुलासा केला असून कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत आहे, असा गंभीर आरोप सीताराम कुंटे यांनी केला आहे. ७ डिसेंबर रोजी मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना कुंटे यांनी ही माहिती ईडीला दिली आहे.कुंटे यांनी देशमुख यांच्या हस्तक्षेपाची कबुली दिल्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख तसेच मविआ सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे. यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. देशोधडीला लागलेल्या देशमुखांवर पुन्हा एकदा करण्यात आलेले आरोप हे त्यांनी भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची सीमा कितपत गाठली होती, हे दाखवून देतात.’ तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुखांवर पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप केला आहे. जो माणूस १०० कोटींची वसुली करू शकतो, तो काहीही करू शकतो, यात शंकाच नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापरसुद्धा केला आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामीही केली. मात्र आता या सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचं पितळ उघडं पडत आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून बेहिशेब संपत्ती गोळा करणाऱ्या देशमुखांना आणि अशा सर्व मंत्र्यांना चपराक बसणं गरजेचं आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!