Share

“तू नेहमीच माझा…”; विराट कोहलीसाठी मोहम्मद सिराजची भावनिक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर सर्व सहकारी खेळाडूंनी त्याच्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश लिहिले. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे नाव देखील सामील झाले आहे. त्याने विराटसाठी खूप भावनिक पोस्ट लिहिली आणि त्याला नेहमीसाठी आपला कर्णधार म्हटले आहे. सिराजच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

गेल्या वर्षी टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून वगळण्यात आले होते. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळीच विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्याने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

मोहम्मद सिराजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीसोबत भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना काही फोटो शेअर केली आणि त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल विराट कोहलीचे आभार मानले.

सिराजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या सुपरहिरोजबद्दल, मला तुझ्याकडून मिळालेल्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल मी तुझे आभार मानू शकत नाही. तू माझ्यासाठी नेहमीच चांगला भाऊ आहेस, इतक्या वर्षात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच माझा कर्णधार किंग कोहली राहशील.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!