🕒 1 min read
भंडारा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून निदर्शने सुरु आहेत. नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे.
मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण मोदी आडनाव असणाऱ्या एका गावगुंडाबद्दल बोलत होतो असा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडले आहे. पोलिसांकडून लोकांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. पण भाजपा बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न जे केंद्र सरकारने निर्माण करुन ठेवले आहेत. या सगळ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी एखाद्या मुद्द्याला घेऊन अर्थाचा अनर्थ करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.
नाना पटोले यांच्या या स्पष्टीकरणानंतर पोलिसांनी मात्र वेगळेच उत्तर दिले आहे. उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, १६ तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि त्याबद्दल पोलिसांना ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशी सुरु असून त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना कोणाला अटक केली आहे का? असं विचारलं असता कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
आता चिरंजीवी यांची मुलगी श्रीजी घेणार घटस्फोट? जाणून घ्या नेमकं प्रकरण
-
“हे मरण्या-मारण्याचे तुमच्या काँग्रेस पक्षाचेच संस्कार”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
-
होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या संपर्कात राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन!
-
जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही; चंद्रकांत पाटलांचा सवाल
-
राऊतांच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
