🕒 1 min read
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली. पण निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने (BJP) हा मुद्दा चांगलाच तापवला असून आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे पटोलेंच्या वक्तव्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि न्यायालयात दाद मागणार आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, नाना पटोले म्हणतात मोदींना मारु, नवाब मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखऊ. या सर्वावरुन राज्यात हम करे सो कायदा असं चित्र आहे. नारायण राणेच्या (Narayan Rane) वक्तव्यावर कारवाई केली जाते पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. जो न्याय राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“समाजवादी पार्टीच्या एका फॉर्ममध्ये आपले नाव नोंदवा आणि ३०० यूनिट वीज मोफत मिळवा”
-
‘…त्यामुळे आम्हाला निष्ठेची भाषा शिकवू नका’; आव्हाडांचे ठाण्याच्या महापौरांना खडेबोल
-
काँग्रेसच्या दणक्यानंतरच ऐतिहासिक मेहमुद दरवाजाचे काम सुरु- हिशाम उस्मानी
-
“…या गोष्टीची खिल्ली उडवणे योग्य नाही”, रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू
-
एमपीएससीने आपली यंत्रणा सक्षम आणि विश्वासार्ह बनवावी- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
