Share

‘आता मुख्यमंत्री कुठे पळाले?’; नाना पटोले प्रकरणी सोमय्यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून निदर्शने सुरु आहेत. नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तसेच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

या सगळ्या प्रकरणावर नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे. मात्र, भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. आता काँग्रेसच भाजपविरोधात तक्रार दाखल करेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणतात, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडी देवींची उपमा दिली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनी लगेच तुरुंगात टाकले. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे पळाले, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!