Share

‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांची कसलीच पर्वा राहिली नाही’; चंद्रकांत पाटलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यावरून राजेत राजकारण देखील पेटले. मोर्चे, आंदोलन ही देखील सुरूच आहे. या मुद्द्यावरून भाजप पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी आपापली राजकीय पोळी देखील भाजून घेतली. हे सगळं झाल्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचा निर्णय देखील घेतला. त्यानंतर काही प्रमाणात एसटी बस सुरू झाल्या. मात्र भाजपचे टीका करणं अजूनही सुरूच आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. मविआ सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे, मात्र इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही, अशा शब्दात चांद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणतात, वेतन सोडा त्यांना आपले घर सांभाळण्यासाठी रेशनची सुविधादेखील तुम्ही करू शकला नाहीत, अखेर भाजपाने एसटी कर्मचारी (ST Workers) बांधवांसाठी रेशनाची सुविधा केली. सरकारचा हा निष्काळजीपणाचा कारभार कधी संपेल माहीत नाही, मात्र भाजपा सदैव एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास देखील त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!