🕒 1 min read
फिरोजपूर: कृषी कायदे रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. बुधवारी फिरोजपूर येथून मोदींची रॅली होती. मात्र ऐनवेळी त्यांना ही रॅली रद्द करावी लागली आहे. खराब हवामान असल्याने ही रॅली रद्द केली असल्याचे कारण देण्यात येत होतं मात्र मोदींच्या सुरक्षेचे कारण आता देण्यात येत आहे. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात सुरक्षेत चूक झाल्याची माहिती मिळत आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक पुष्टी करण्यात आली होती. सुरुवातीला मोदी हेलिकॉप्टरने जाणार होते मात्र खराब वातावरण असल्याने रस्त्याने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. भटिंडा पासून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक असा तब्बल दोन तासांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्याने सुरू केला होता.
हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला आणि तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती.
या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला तसेच या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हिमायत बागेतील वृक्षतोड न थांबल्यास २६ जानेवारीला उपोषण; निसर्गप्रेमींचा आत्मदहनाचा इशारा!
- अब्दुल सत्तार नया है वह; युतीच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा टोला..!
- …आतातरी सरकारने कसलेही कठोर निर्बंध लावू नये- चंद्रकांत पाटील
- संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव
- अभिताभ बच्चन यांच्या जलसामध्ये कोरोनाची एन्ट्री; सुमारे ३१ कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
