🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यातच ओमायक्रोनचे रुग्णही वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच २४ डिसेंबर पासून निर्बंधही लावण्यात आले आहेत. तर आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यातही राज्यात कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात अशी शक्यता अजित पवार यांनी वर्तवली आहे, मात्र यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कठोर निर्णय लावू नयेत अशी मागणी केली आहे.
नियम सांभाळून का होईना, जनजीवन आता सुरू राहायला पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्याचा सरकारने विचार केला पाहिजे. माणूस हा चावी लावून बंद केला आणि चालू केला, असं होतं नाही. प्रत्येकाला केवळ आपली नोकरी आणि व्यवसायाची काळजी नसून मनस्थितीचीही काळजी आहे. पुन्हा लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत. २ वर्ष हा माणसाच्या जीवनातला फार मोठा कालावधी असून त्यांनी इतके दिवस सहन केले. त्यामुळे आतातरी सरकारने कसलेही कठोर निर्बंध लावले नाही पाहिजेत. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा लॉकडाऊनसाठी नागरिक आता तयार होणार नाहीत. २ वर्ष हा माणसाच्या जीवनातला फार मोठा कालावधी असून त्यांनी इतके दिवस सहन केले. त्यामुळे आतातरी सरकारने कसलेही कठोर निर्बंध लावले नाही पाहिजेत. pic.twitter.com/WTeBbQJh9J
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 5, 2022
दरम्यान यावेळी पाटील यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसेच ‘अनाथांची माय’ या दोनच शब्दांमध्ये सिंधुताईंचे सार्थ वर्णन आहे. मी मंत्री असताना पुण्यातील त्यांच्या कार्यालयात एकदा गेलो होतो. सिंधुताईंनी सांगितलेल्या विविध प्रकल्पांना भविष्यात पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन.असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “तुमच्या गाऊन घालण्याच्या हट्टापायी…”; फडणवीसांचा उदय सामंतांना खोचक टोला
- महाराष्ट्रातून भाजप कार्यकर्ते उत्तर प्रदेशात प्रचारासाठी जाणार- देवेंद्र फडणवीस
- औरंगाबादकरांसाठी महत्वाची बातमी; ६ जानेवारीपासून शहरातील शाळा बंद..!
- “मला मारलं बिरलं तर लफडं व्हायचं म्हणून..” भाजप आंदोलनानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
- “मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरु, याचं श्रेय राज्यपालांना…”, रावसाहेब दानवेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
