Share

संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसोबतच आता राजकीय नेत्यांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला असल्याचे आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे. राज्यातील ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, खासदार सुजय विखे पाटील तसेच इतर अनेक मोठ्या नेत्यांना कोरोना झाला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट आला असून राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, या सर्वांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!