Share

“नितीन गडकरींनी विनंती केली तर…”; अब्दुल सत्तारांचे भाजप-शिवसेना युतीचे संकेत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी युतीचे संकेत दिले असून पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगितले. तसेच भाजप-शिवसेना युतीचा पुल फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बांधू शकतात, असे देखील सत्तार म्हणाले.

“लोकांना माहित आहे नितीन गडकरी म्हणजे राजकारणाचे चालते-बोलते विद्यापीठ आहे. हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. यांनी कधी ठरवलं पुल बांधण्याचा तर तो कसा जोडणे, कुठे जोडणे हे त्यांना राजकारणी म्हणून चांगले माहित आहे. त्यांच्या नावाची चर्चा देशभर असते. हा भाजप-शिवसेनेचा पुल जोडायचे त्यांनी मनामध्ये घेतले तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील आणि त्यांनी विनंती केली तर उद्धव ठाकरे यावर अंतीम निर्णय घेतील.”, असे अब्दुल सत्तार एका वृत्तवाहिणीशी बोलताना म्हणाले.

युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठे विधान

प्रवीण दरेकर म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार म्हणून अलीकडच्या काळात मुख्यमंत्री किंवा शिवसेनेकडून होणारी विधाने बघता भविष्यात भाजपसोबत शिवसेना लढेल असे दिसत नाही. त्यामुळे अर्जुन खोतकर जर भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करुन उमेदवार असल्याचे दर्शवित असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दोन दिवसांपूर्वी आम्ही नवीन मित्र जोडले असल्याचे सांगितले. त्यामुळे जुन्या मित्राशी फारकत असल्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय असू शकतो.”

यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेला पक्ष म्हणून त्याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी पुण्यात अत्यंत चिंताजनक वक्तव्य केलं. ‘पुण्यात शिवसेना संपवायच काम अजून सुरु आहे’. या दृष्टीने मला वाटत हा जरी पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी मला वाटते त्यांनी (शिवसेनेने) काळजी घेण्याची आवश्यकता आहे.”

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!