🕒 1 min read
मुंबई : मंडल आयोगासाठीचा लढा दलितांनी लढला. ओबीसी या लढ्यात मागे होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केले होते. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार आहेत, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडलं होतं. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा खोचक सवाल पडळकर यांनी आव्हाड यांना केला.
पुढे पडळकर म्हणाले, वेळ पडली तर प्रशासक नेमू… म्हणजे आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच त्यांचा हेतू आहे. एवढंच जर प्रेम असेल तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या आणि निवडून आणणार का?, असे आव्हान पडळकरांनी आघाडीला दिले आहे. ओबीसीला आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व आणि फसवी आहे.
मागचं दीड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आताही ते काय करत आहेत, याबद्दल कुठलीच माहीती नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना या सरकारचे मंत्री मोठमोठ्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत, असा टोला पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी गोव्यात घेतली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
